Saturday, December 13, 2008

"मी"

मी...
मेघवेडा आकाशी रमणारा
मी...
पावसाला भिजवुन त्याला ओला करु पाहणारा
मी...
गुढामधे मुढ होऊन बसणारा
मी...
माणसांना उपभोगुन जगणारा
मी..
असाच कुणीतरी

मी...
जिवनध्येयाला शुद्र मानणारा
मी...
देवाधर्माला पाप मानणारा
मी...
जगणे हेच कर्म मानणारा
मी...
जगण्यासाठी नवे प्रश्न निर्माण करणारा
मी...
एक जिवसृष्टीमधिल अपघात

मी...
रस्त्यांवरती खड्डे बांधणारा
मी...
जगाला हसवुन स्वतःला फसवु पाहणारा
मी...
खुप काही करायचे राहिलेला
मी...
बुध्दीवादाला चिकटुन बसलेला
मी...
एक माजुरडा

मी...
ठोके चालु म्हणुन जिवंत असलेला
मी...
जगण्याच्या वासनेसाठी न मेलेला
मी...
मनात काही नाही म्हणुन तृप्त असलेला
मी...
या कडव्याची चौथी ओळ न सुचलेला
मी...
स्वतःच दुसरा कुणीतरी

मी...
एकलकॊंडा व्यक्तीवादी
मी...
स्वार्थाला पुण्य मानणारा
मी...
आनंद हिच नैतिकता मानणारा
मी...
स्व-अस्तित्वाच्या कोड्याकडे दुर्लक्ष करणारा
मी...
...
या कवितेतही न सापडलेला

- अनामिक मेघवेडा
-------------------------------------------------------------------------------------
मी संदिप खरे बोरकर पाडगावकर यांच्या कविता वाचल्यानंतर २-३ वर्षांपासुन कविता करणे सोडुन दिले होते. परवा ब्लॉगला नाव म्हणुन मेघवेडा आकाशी रमणारा हि ओळ डोक्यात आली. मी शोधाशोध केली तेन्हा हि माझ्याच कवितेतली ओळ असल्याचा ’शोध’ लागला. हि कविता मी ४-५ वर्षापुर्वी लिहिली आहे. आत्तापण ती माझ्याविषयी रिलेवन्ट वाटली म्हणुन पोस्ट केली. पण याउप्पर खुप स्टॉक असुनही आणखी काही कविता पोस्ट करणे होणे नाही...
-------------------------------------------------------------------------------------

Tuesday, December 9, 2008

शांती यात्रा..

चम्या आज सकाळीच उठुन बसला. पण असे सगळे झालेच कसे. कुणीही कधीही आमच्या (कि राज ठाकरेंच्या ??? ) महाराष्ट्रात येउन गोळीबार करते म्हणजे काय ?? त्याचे डोके तीन दिवसांचे (आणि रात्रींचे) live footage बघुन चालेनासे झाले होते. एका आय टि कंपनीमधे बेंचवरील वाघ बनुन राहण्यापेक्षा शुर-वीर बनुन ताजच्या बाहेर दर मिनीटाला ’Breaking News’ द्यावेसे वाटत होते त्याला....

सालं काहीतरी केलच पाहीजे....पाकिस्तानवर हल्ला केला पाहीजे..सर्व नेत्यांनी राजीनामे दिले पाहिजेत... आणि नविन tax नाही भरला पाहिजे... पण income tax वाले फुकट नाही बसलेले... त्याला रंग दे बसंती परत परत बघु वाटु लागला....खुन चला...

मग चम्याने पंतप्रधानांना ,मुख्यमंत्र्यांना किंवा कमीतकमी आबांना एक ओपन लेटर लिहायचे ठरवले. या टेररिस्ट अटॅकच्या अनुषंगानेच सध्याचा आयटि मधिल अन्याय, शिक्षणद्धपत्तीतल्या त्रुटि ईत्यादी अन्यायाला तो वाचा फोडणार होता.

तोपर्यंत त्याच्या आईने त्याला हाक मारली...

“अरे चम्या बास रे आता ... जा लवकर जाउन समोरच्या मॉल मधुन या यादिनुसार वाणसामान आण... ते टेररिस्ट पळुन नाही जात कुठे..”

चम्या निमुटपणॆ उठला ,आणि यादी घेउन बाहेर पडला. पाहिले तर सगळीकडे पोलिस वैगेरे. प्रथम त्याला वाटले की कोणी नेता वैगेरे येणार असतील... पण तरीही त्याने एका हवालदाराला धीर करुन विचारले, तर तो हवालदार प्रथम हसला (सौजन्य सप्ताह नसताना !) मग उत्तरला की “तुमच्या सिक्युरिटिसाठीच आहोत इथे ड्युटीवर ... वरुन फोन आला होता”. हे ऐकुन चम्याला मुठभर मांस चढले !!! तर काहितरी बदल होतोय... शेवटी लोकशाही आहे... लोकांचे राज्य... नेतालोक सगळे नोकर आपले...

येणेकरुन ताठ मानेने, निधड्या छातीने, आणि वैचारिक प्रगल्भतेने चम्या mall च्या दारापाशी पोचला. तक्षणी सिक्युरिटिने त्याला आडवले... चम्या केविलवाणा चेहरा करुन म्हणाला,

“अरे भैय्या, नही पैचाना क्या हमकु? हम वो सामनेवाले बोळ के लागुनही रहते है”.

तर तो भैय्या वदला, “मालुम साब हमको, लेकिन उपरसे बोला है सबको चेक करनेका कोई भी टेररिस्ट हो सकता है”

मालक ते टररिस्ट हा प्रवास चम्याला काही फारसा पचला नाही. आता मात्र चम्या नुसत्याच निधड्या छातीने व वैचारिक प्रगल्भतेने चालु लागला. पण नको नको म्हणताना नाही नाही ते चम्याच्या डोक्यात आलेच. कशावरुन या मॉल मधेच बॉम्ब किंवा काही लोचा नसेल. आणि मग त्याला त्याच्या आसपासच्या लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटु लागल्या. त्याने बारीक नजरेने सर्वत्र पहायला सुरुवात केली. त्याला आपण स्कॉटलंड यार्ड किंवा कमीतकमी मुंबई पोलीसमधे अधिकारी असल्यासारखे वाटले. पण इतर सर्व लोकांच्या नजरेवरुन त्याच्या लक्षात आले की या सर्व नादात आपणच संशयास्पद हालचाली करत आहोत! मग चम्याने तो नाद सोडुन दिला.

पण आपण पोलीसमामा नाही झालो तरीही आपली हुतात्मा होण्याची शक्यता कमी होत नाही हे चम्याच्या लक्षात आले. मग चम्या फक्त वैचारिक प्रगल्भतेने चालु लागला. तोवर चम्याला समोरुन ऑड्या येताना दिसला. तो कंपनीत शिकवल्याप्रमाणे ऑड्याला कॉनफिडन्टली हॅलो करणार होता, पण फुगा फुटल्यासरखा तो म्हणाला,

“साला जाम फाटली आहे रे माझी..!!”.

“माझी पण !!” ऑड्या म्हणाला.

“सालं काहितरी केल पाहिजे ..” आता चम्याला कोणीतरी समःफट्टु मिळाले होते.

चम्या आता वैचारीक प्रगल्भतेने त्याच्या समःफट्टु साथीदाराबरोबर चिंतन करीत होता. मधुन मधुन “भडवे साले...” “गांडु साले...” असे वैचारीक कल्लोळ उठत होते. आणि नवा शोध लागल्यासरखा ऑड्या म्हणाला,

“च्यायला विसरलोच कि ,आज संध्याकाळी पीस मार्च आहे साला आपण जायलाच हवे... समजतात काय स्वःताला”.

“पण त्याने काय होणार ?” चम्या बाळबोध चेहरा करुन म्हणाला.

“अरे हे सगळे सिम्बोलिक असते”-ऑड्या.

“सिम्बोलिक म्हणजे ?” – चम्या.

“ते तुला समजायचे नाही, तु येतोय कि नाही? एवढे सगळे झाले तरी तुझ्यासरख्या चुत्या लोकांना त्याचा काही फरक पड्त नाही” – ऑड्या.

शिवी ऎकल्यावर मात्र चम्या जामच पेटला, “तु किती वाजता ते बोल..”

मग ऑड्याने चम्याला सगळा प्लॅन व्यवस्थित समजावुन सांगितला.

तर अशा रितीने चम्या मनात टेररिस्ट अटॅकची भीती व त्याचे सगळे सामान सुमान घेउन ठरलेल्या ठिकाणी येऊन पोचला. बरीच माणसे जमली होती, चम्याच्या मनात अजुनही नको नको म्हणताना नाही नाही ते चालु होते. मग चम्याला ऑड्याने दिलेली शिवी आठवली, आणि मग तो हनुमंतरायाचे नाव घेउन ऑड्याला गर्दीत शोधायला निघाला. ऑड्या तिथे एका ठिकठाक मुलीशी लोचट्पणे बोलत होता. ती काही त्याला भाव देत नव्हती. मग ऑड्याने पटकन कलटी मारली व चम्याला येउन म्हणाला,

“कळत कसं नाही तिला, आपण रुट ऑफ द प्रोब्लेमवर अटॅक केला पाहीजे. तु सामान आणलेस सगळे?”

......

..

चम्या हवेत होता. कुठल्याही राजकीय पक्षाने न बोलवता केव्हडी माणसे जमली होती!!! चम्याने त्याच्याकडे असलेल्या सर्व नम्बर्सवर प्रिपेडचा बॅलेंस संपेपर्यंत sms ची खैरात केली. एव्हडे sms त्याने दिवाळी किंवा न्यु इयरलापण नव्हते पाठवले. चम्याने व ऑड्याने पांढरा शर्ट आणि काळी पॅन्ट घातली होती. एका हातात मेणबत्ती, दुसरया हतात बोर्ड “Let the Peace be with you!” “All for Peace peace for one”. चम्याने तेथे अनेक लोकांशी ’वैचारिक टॉक’ केला,


त्यातील त्याला पटलेल्या / भावलेल्या गोष्टी पुढीलप्रमाणे...


“सर्व टेररिस्ट मुसलमान असतात...”

“सर्व मुसलमान टेररिस्ट असतात...”

“पण मग त्या साध्वीचं आणि RSS वाल्यांचं काय???”

“सर्व धर्म शांततेचा आणि एकतेचा संदेश देतात”

“हि सगळी इंडियन गव्हर्नमेंन्ट्ची खेळी आहे...”

“हि सगळी लश्कर / आयसआय / पाकिस्तान ची खेळी आहे...”

“सर्व राजकारणी हरामखोर आहेत”

“अशा मोठ्या शहरात अशा छोट्या गोष्टी होतच राहतात”

“जर मी त्यांच्या / तुमच्या जागी असतो तर मी काय केल असतं....”

“सर्व नेते आपणच निवड्तो मग याला आपणच जवाबदार आहे”

“आपण इलेक्शनच्यावेळी वोट करत नाही आणि मग नालायक लोकं निवडुन येतात म्हणुन याला आपणच जवाबदार आहे”

“नेते लोक आपल्यातुनच येतात, ते काही आकाशातुन पडत नाहीत, म्हणुन याला आपणच जवाबदार”

“परत हेच हरामखोर राजकारणी निवडुन येतील, मतदानावर बहिष्कार करा. टॅक्स भरु नका”

“वोट फोर चेन्ज”

“सचिन तेंडुलकरला एक मॅच खेळण्याचे १ कोटी मिळतात आणि आपल्या जवानांना १० हजार”

“कलीयुगात असेच व्हायचे, माणसांची पापे जास्त झाली आहेत”


चम्याला न पटलेल्या / दुर्लक्षिलेल्या गोष्टी...


“या सर्व टेररिस्ट्चा हा विश्वास होता कि ते धर्मासाठी लढ्त आहेत, जर ते मेले तर त्यांना त्याच्यासाठी एक वेगाळा स्वर्ग आणि हौरी मिळतील”

“प्रत्येक धर्माचे अस्तित्व दुसरया धर्माला डावलुनच आहे. प्रत्येक धर्मामधे त्यांच्या सोडुन दुसरया देवाची पुजा करणे हे सरळ-सरळ / आडुन-आडुन पाप आहे. आणि जर तुम्ही या पाप्याला मारलेत तर तुम्हाला स्वर्ग मिळेल”

चम्या आता घरी निघाला होता, डोक्यात विचार चालु होता त्याला धर्माविरुद्ध कुणीही बोललेले रुचले नव्हते. पण यासगळ्या गोष्टी गौण होत्या, असल्या गोष्टी लोक दर चार पाच दिवसांनी बोलतच असतात.पण एक गोष्ट मात्र नक्की क्रांती आता दुर नाही. आणि या नेत्यांचे दिवस भरत आले. आता तरी शहाण्यासारखे वागतील साले. चम्याच्या मनातली भिती कमी झाली नसली तरी वैचारिक प्रगल्भता मात्र तिप्पट झाली होती.


चम्याने घरी आल्यावर आईला स्वयंपाकघरात येऊन सगळा वॄत्तांत ऎकवला. चम्याची आई शांतपणे सगळे एकुन म्हणाली,

“गॅस जाणार असं दिसतय आज, तरी मी यांना म्हणले होते...”

तरी दिढमुढ न होता चम्याने नेटाने News Channel सुरु केला. Breaking News अजुनपण सुरु होत्या त्या खालीलप्रमाणे

“चव्हाण महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री”

“विलासरावच पडद्यामागचे सुत्रधार ??”

“राणेंची बंडखोरी, २५ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा”

“सरकारला कोणताही धोका नाही – चव्हाण”

“मुस्लिम संघटनांची पाकवर हल्ल्याची मागणी”

“चार राज्यात मतदान, मतदारांनी मोठ्या संखेने मतदान केले, मतदारांचा अजुनही लोकशाहीवर विश्वास !!”

“जगात एक अल्लाचा इस्लाम असतो आणि मुल्लाचा इस्लाम – शाहरुख”

“पुणे पोलीसांनाच्या नुतनीकरणाचा ठराव अजुनही धुळ खात”

“मुंबई पोलीसांकडे पैसे होते, शस्त्रास्त्राऎवजी घेतल्या होत्या नव्या पोलीस व्हॅन”

आता मात्र चम्याची वैचारिक प्रगल्भताही संपली.

तोवर लाइट गेली आणि अवेळी भारनियमनची चम्याला प्रर्कषाने जाणिव झाली. आणि चम्यानी त्यांच्या मातोश्रींचा कडकडाट ऎकला,

“काय नस्ते उद्योग मेल्याचे, घरच्या सगळ्या मेणबत्या गायब. ऎनवेळी एक मेणबत्ती नाही. सगळ्या मेणबत्त्या रस्त्यावर पेटवुन आले मेले. भिकेचे डोहाळे सगळे...”

आता मात्र चम्याच्या डोक्यातली संपुर्ण क्रांती उतरली.