Saturday, December 13, 2008

"मी"

मी...
मेघवेडा आकाशी रमणारा
मी...
पावसाला भिजवुन त्याला ओला करु पाहणारा
मी...
गुढामधे मुढ होऊन बसणारा
मी...
माणसांना उपभोगुन जगणारा
मी..
असाच कुणीतरी

मी...
जिवनध्येयाला शुद्र मानणारा
मी...
देवाधर्माला पाप मानणारा
मी...
जगणे हेच कर्म मानणारा
मी...
जगण्यासाठी नवे प्रश्न निर्माण करणारा
मी...
एक जिवसृष्टीमधिल अपघात

मी...
रस्त्यांवरती खड्डे बांधणारा
मी...
जगाला हसवुन स्वतःला फसवु पाहणारा
मी...
खुप काही करायचे राहिलेला
मी...
बुध्दीवादाला चिकटुन बसलेला
मी...
एक माजुरडा

मी...
ठोके चालु म्हणुन जिवंत असलेला
मी...
जगण्याच्या वासनेसाठी न मेलेला
मी...
मनात काही नाही म्हणुन तृप्त असलेला
मी...
या कडव्याची चौथी ओळ न सुचलेला
मी...
स्वतःच दुसरा कुणीतरी

मी...
एकलकॊंडा व्यक्तीवादी
मी...
स्वार्थाला पुण्य मानणारा
मी...
आनंद हिच नैतिकता मानणारा
मी...
स्व-अस्तित्वाच्या कोड्याकडे दुर्लक्ष करणारा
मी...
...
या कवितेतही न सापडलेला

- अनामिक मेघवेडा
-------------------------------------------------------------------------------------
मी संदिप खरे बोरकर पाडगावकर यांच्या कविता वाचल्यानंतर २-३ वर्षांपासुन कविता करणे सोडुन दिले होते. परवा ब्लॉगला नाव म्हणुन मेघवेडा आकाशी रमणारा हि ओळ डोक्यात आली. मी शोधाशोध केली तेन्हा हि माझ्याच कवितेतली ओळ असल्याचा ’शोध’ लागला. हि कविता मी ४-५ वर्षापुर्वी लिहिली आहे. आत्तापण ती माझ्याविषयी रिलेवन्ट वाटली म्हणुन पोस्ट केली. पण याउप्पर खुप स्टॉक असुनही आणखी काही कविता पोस्ट करणे होणे नाही...
-------------------------------------------------------------------------------------

1 comment:

निखिल said...

Apratim!!!

Khup honestly lihali ahes...